1. मुखपृष्ठ
  2. माहिती
  3. शैक्षणिक
  4. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देलवडी, २०१५ मध्ये शाळेस आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. उपक्रमशील शाळा म्हणून सन्मान पत्र प्राप्त झाला.तो तर्फे दौंड रहिवासी संघ हडपसर यांच्या मार्फत प्राप्त झाला आहे. सतत सात वर्षे सलग जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा लेझीम गटांमध्ये मुलांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. १५ लाख रुपये लोकसहभागातून जय मल्हार उद्यान, सिमेंट कॉंक्रीट रस्ता, संरक्षक भिंत, ग्राऊंडच्या चारही बाजूंनी आरसीसी ब्लॉक, निसर्गचित्र, वॉटर फिल्टर, संगणक लॅब, ग्रंथालय इत्यादी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.
शाळा सद्यस्थिती आरसीसी वर्गखोल्या आहेत. विद्यार्थी संख्या इयत्ता पहिली ते सातवी २०१ आहे. पिण्याच्या पाण्याची सोय, स्वतंत्र बोरवेल, स्वतंत्र शौचालय व मुताऱ्या, अद्ययावत किचनशेड, लोखंडी प्रवेशद्वार, आकर्षक बाग, शाळेच्या चारही बाजूंनी डिडोनिया व फायकस, बॉटल पाम, मिलियन टोनर इत्यादी झाडांनी सुशोभित व निसर्गरम्य परिसर आहे.
 सांस्कृतिक कलामंच, सर्व वर्ग सेमी, प्रशिक्षित शिक्षक, पुरस्कार प्राप्त शिक्षक, जिल्हा व तालुका स्तर मान्यवर संस्थांचे पुरस्कार प्राप्त शिक्षक व शाळा उपक्रम, स्पर्धा परीक्षांचे आयोजन, शिष्यवृत्ती, नवोदय, मंथन, सामान्यज्ञान, विज्ञान, पाढे पाठांतर, सुंदर हस्ताक्षर, स्पेलिंग पाठांतर, शिक्षण फाउंडेशन च्या वतीने अभ्यासपूरक उपक्रम व अंमलबजावणी, कला व क्रिडा स्पर्धांचे आयोजन, वार्षिक स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, परिसर भेटी, विविध सण, उत्सव, जयंती यांचे आयोजन, विज्ञान प्रदर्शन, आनंद मेळावा, बाल वृक्षदिंडी, शालेय मंत्रिमंडळ निवडणूक, महिला
पालक मार्गदर्शक मेळावा, विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम शाळेत राबविले जातात.

zpp (1)
zpp (2)
zpp (21)
zpp (22)
zpp (20)
zpp (19)
zpp (18)
zpp (17)
zpp (16)
zpp (15)
zpp (14)
zpp (13)
zpp (12)
zpp (11)
zpp (10)
zpp (9)
zpp (8)
zpp (7)
zpp (6)
zpp (5)
zpp (4)
zpp (3)
previous arrow
next arrow

बंद