1. मुखपृष्ठ
  2. माहिती
  3. धार्मिक स्थळे...
  4. बोधलेबाबा

बोधलेबाबा

दरवर्षी पाडव्या नंतरच्या एकादशीला म्हणजेच चैत्र शुद्ध एकादशीला देलवडी गावात बोधले महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते. अगदी मुळा-मुठा नदीच्या काठाला घाटा शेजारी हे समाधी स्थळ. या समाधीस्थळाचे छोटेखानी मंदिरात रुपांतर करण्यात आलेले आहे.

     मुळा-मुठा व भीमा नदीच्या काठाला अनेक संतांचे वास्तव्य होऊन गेले. देलवडी गावातील बोधले महाराज त्यापैकीच एक. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील काटे धामणगाव ते बोधले महाराजांचे मूळ गाव. माणकोजी बोधले हे त्यांचे नाव. पंढरपूर व आळंदी या मार्गावरती असलेल्या देलवडी गावात माणकोजी बोधले यांचे वास्तव्य अखेरपर्यंत राहिले. अनेक वर्ष या संत महात्म्याची सेवा करण्याचे पुण्य देलवडी करांना लाभले. वृद्धापकाळात बोधले महाराजांचा भक्त सावित्रीबाई वारकरी यांनी खूप सेवा केली. पाडल्यानंतर चा चैत्र शुद्ध एकादशीला बोधले महाराजांचे निधन झाले. देलवडी ला नदीकाठी त्यांचे समाधीस्थळ उभारण्यात आले आजही या ठिकाणी दरवर्षी या दिवशी भंडारा केला जातो. बोधले महाराजांचे नातू शिवाजी मनोहर बोधले यांनी या दिवशी देलवडी ला येत असत अनेक वर्ष कीर्तन सेवा दिली भजन भंडारा व किर्तन असा कार्यक्रम या दिवशी असायचा. परंतु गुरुजी वारल्यानंतर मात्र बोधले कुटुंबातील कोणीही या दिवशी फिरताना दिसत नाही. कै.सावित्रीबाईंनी  बापूराव खंडू शेलार यांना मानसपुत्र मानले होते. त्यामुळे सावित्रीबाईंच्या पश्चात बोधले महाराजांच्या समाधी स्थळ याठिकाणी पुण्यतिथी दिवशी पूजा करण्याचा मान शेलार कुटुंबियांना मिळालेला आहे. आजच्या घडीला खंडेरायाचे अनेक भक्त नदी वरून गडावरती पाणी घालायला जात असतात. या सर्व भक्तांना सर्वात आधी बोधले महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घडते. पाणी घालत नतमस्तक होणाऱ्या या भक्तांना मात्र समाधी स्थळाची माहिती नसते. अल्पसे देलवडीकरचं या संताबाबत माहिती सांगतात.

शिवरामबाबा

बोधले महाराजांच्या पश्चात अजून एका संतांच्या पदस्पर्शाने देलवडी पावन झाली ते म्हणजे शिवराम बाबा होय. बोधले महाराजांच्या समाधी स्थळा जवळचं दुसरे छोटेखानी मंदिर आहे.ते म्हणजे शिवराम बाबांचे समाधी स्थळ होय.

  आळंदी ते पंढरी हा पायी प्रवास करणाऱ्या अनेक विठ्ठल भक्तांना पैकी एक म्हणजे शिवराम बाबा. इंदापूर तालुक्यातील बोरी काजड हे त्यांचे गाव. आळंदीच्या वाटेवर असणाऱ्या देलवडी गावात शिवराम बाबा नेहमी येता-जाता अनेकदा मुक्काम करत. कै. गुलाबराव माने कै. धोंडोपंत दादा शेलार तसेच कै. विठ्ठल धुमाळ (कासार) यांच्याकडे शिवराम बाबांचा मुक्काम असे. अतिशय सहिष्णू,नामस्मरण व भजनात शिवराम बाबांचे जीवन व्यतीत होई. या संताचा शेवटही देलवडी गावात झाला. शिवराम बाबा बोधले महाराज व संगम क्षेत्रावरील संतराज महाराज पवार या संतांच्या वास्तव्याने आपला गाव पावन झालेला आहे.

बंद