1. मुखपृष्ठ
  2. माहिती
  3. सहकारी संस्था...
  4. पिडीसीसी बँक

पिडीसीसी बँक

देलवडीला वरदान लाभलेल्या मुळा-मुठा नदीला बारमाही पाणी असल्यामुळे देलवडी हे गाव सुजलाम-सुफलाम व बारमाही शेती करणारं गाव आहे. त्याचबरोबर या गावात मोठ्या प्रमाणामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय चालतो. त्यामुळे वीस वर्षांपूर्वी देलवडी गाव मध्ये बँक नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत होत्या. देलवडीतील लोकांना बँक व्यवहार करण्यासाठीव सोसायटी व्यवहारासाठी खुटबाव, पारगाव या गावांवरती मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची गैरसोय होत असे. म्हणून या गावात एक नवीन बँकेची शाखा उघडावी असे गावकऱ्यांना वाटले व म्हणून देलवडी विविध कार्यकारी सोसायटीचे तत्कालीन चेअरमन कै. बाळकृष्ण शेलार आणि देलवडी ग्रामस्थांच्या प्रयत्नातून व तत्कालीन आमदार कै. सुभाषअण्णा कुल व पीडीसीसी बँकेचे चेअरमन श्री. रमेशआप्पा थोरात यांच्या सहकार्याने देलवडीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेची सुरुवात करण्यात आली. या शाखेच्या उद्घाटनासाठी देलवडी गावामध्ये खूप मोठा मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते व या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आजचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार. अजितदादा पवार हे उपस्थित होते. या शाखेमध्ये एकूण ३३१७ खातेदार आहे. सर्व मिळून या शाखेमध्ये ०९ कोटी ३५ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. या शाखेचे शाखाप्रमुख म्हणून सद्य परिस्थितीमध्ये श्री.जे. एम. बनकर हे कामकाज पाहतात. 

संपर्क क्रमांक – 8380024077

pdcc
pdcc
PlayPause
previous arrow
next arrow
बंद